जळगाव ;- गांजा बाळगल्याप्रकरणी तिघांना रामानंद नगर पोलिसांनी अटक केली होती . त्यांना न्यायालयात हजर केले असता कोठडी सुनावण्यात आली आहे.
माहिती अशी की, सहायक पोलीस अधीक्षक डॉ़ निलाभ रोहन यांच्या पथकासह रामानंदनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास पिंप्राळा गाठले. त्यानंतर तलाठी कार्यालयाजवळ सापळा रचल्यानंतर काही वेळानंतर संशयित आरोपी शाहरूख सलीम खाटीक (वय-२६), करण प्रकाश पवार (वय-२१) आणि वाल्मिक तानाजी सुर्वे (वय-२५) तिघे रा. गेंदालाल मील जळगाव यांचा पाठलाग करून पकडून झडती घेतली असता त्यांच्याजवळ ९६ हजार रूपये किंमतीचा सात ते आठ किलो गांजा पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएच ८८९४) असा एकुण १ लाख ६ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तिघांना अटक केली होती. आज तिघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता तिघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.