जळगाव ;- आज प्रशासनाकडून प्राप्त अहवाला नुसार जिल्ह्यातील ५५ स्वाब घेण्यात आले होते . यापैकी शिरसोली येथील ३ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव आले आहेत . त्यामुळे शिरसोलीकरांना दिलासा मिळाला आहे . गेल्या काही दिवसांपासून शिरसोली मध्ये दररोज रुग्नांची वाढ होत असल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली होती . आतापर्यंत १४ पॉझिटिव्ह रुग्ण शिरसोली गावात आढळून आले आहेत .