जळगाव ;- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता ती वाढतच असल्याचे चिंताजनक आहे . मात्र आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेचे सर्व २०० डॉक्टर अविरत सेवा बजावत असून कोव्हीड -१९ अर्थात कोरोना झालेल्या रुग्णांंचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असून स्वेच्छेतेने हि सेवा देत आहे .
जळगावात जिल्हा सामान्य रुग्णालय हे कोव्हीड रुग्णालय म्हणून ओळखले जाते . तसचे मनपा शाहू महाराज रुग्नालयासह इतर खासगी रुग्णालये कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सज्ज करण्यात आली आहेत . त्या पार्शवभूमीवर जळगाव शहरात आयएमए या संघटनेचे डॉक्टर्स विना मानधन आपली सेवा बजावत आहेत . तसेच प्रत्येक डॉक्टर कोव्हीड आयसीयू ,क्वारंटाईन केलेले रुग्ण , उपचार घेणारे कोरोनाबाधित सह सर्वाना सेवा देत असल्याने त्यांचे कामाचे कौतुक होत आहे. मात्र आयएमए संघटनेच्या डॉक्टरांनी आपली सेवा बजावत आहे. फिजिशियन , भूल तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ मंडळी आयएमए संघनेचे अहोरात्र सेवा बजावत असताना सर्जन , आर्थोपेडिक ,नाक कान घास तज्ज्ञ , स्त्रीरोग तज्ज्ञ .रेडिओलॉजिस्ट आदी डॉक्टरांची मदत मिळत आहे . आहे . स्थानिक डॉक्टर्स असल्याने काही पेशंट ओळखत असल्याने त्यांना बघितल्यास रुग्णांना दिलासा मिळत असतो .