वडती ता.चोपडा प्रतिनिधी:- येथील विकास कामे एक वर्षापासून १४ वित्त आयोगातून अनेक विविध विकास कामे एक कोटीच्या आसपास झालीत .त्यातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची ग्रामपंचायत कडून केली जात आहे .आठ महिन्यापासून covid-१९ विषाणूने सर्वीकडे धुमाकूळ घातल्याने नावाने ग्रामसभा व मासिक सभा शासनाने बंद केल्यामुळे , याचा गैरफायदा सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी १४ व्या वित्त आयोगातून आलेला निधी मनमानी कारभाराने खर्च करून तसेच ,अपूर्ण कामे पूर्ण दाखवण्यात आली आहेत .अनेक वेळा मासिक मीटिंग ची मंजुरी व ग्रामसभा मंजूरीची प्रोसिडिंग मागूनही मिळून येत नाही .किंवा दिली जात नाही, गावात बंदिस्त गटारी, गटारी वरील दाफे , गावातील कॉंक्रीट रस्ते, पेवर ब्लॉक , ग्रामपंचायत वॉल कंपाऊंड , सार्वजनिक शौचालय , ग्रामपंचायत मधील शॉपिंग बांधकाम , गावातील घाण कचरा वरील खर्च, जुनी पाण्याची टाकी दुरुस्ती , तसेच गावात आरो प्लांट सह झालेली विविध विकास कामे अत्यंत कमी खर्चात बांधून निकृष्ट दर्जाची केली आहेत . तर काही कामे खर्च करूनही झालेली नाही .गावात कुठेही आरो प्लांट बसवलेले नाहीत, अनेक वेळा संबंधित कार्यालयात माहिती मागूनही नागरिकांना माहिती मिळत नाही .लाखो रूपयाचा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न अधिकारी वर्गात सुरू आहे , माहिती अधिकारात ही ग्रामपंचायत कार्यालयाकडून माहिती मिळून येत नाही. तर अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात . तरी ग्रामसेवक सरपंच तसेच कार्यकारी समिती यांचा मनमानी कारभारातून झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागंणी केली जात आहे.
तक्रारदारांना न्याय न् मिळाल्यास आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसू, असे दत्तू पाटील, महेंद्र पाटील , समाधान धनगर , कांतीलाल पाटील विकास सोसायटीचे चेअरमन, सुरेश पाटील, विलास पाटील माजी उपसरपंच ,भीमराव पाटील , संदीप साळुंखे , लोटन पाटील, किरण पाटील यासह आदी ग्रामस्थानी.. म. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.








