जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव – शिरसोली रस्त्यावर फोरव्हिलर कूलझर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यशवंत मोतीलाल पाटील (वय 37) रा. शिरसोली असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.

यशवंत पाटील हे लग्न आपटून जळगावहुन शिरसोली येथे आज सोमवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास ते दुचाकीने घरी परतत असताना शिरसोली रस्त्यावरील कृष्णा लाँनच्या पुढे हनुमान मंदिराजवळ अज्ञात फोरव्हिलर कुलझर वाहनाने जोरदार धडक दिली. यात यशवंत पाटील यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर जळगावात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अद्याप पोलिसात कुठलीही नोंद नाही. तसेच अपघातामुळे दुचाकीचे नुकसान झाले आहे.कुलझर चालक वाहनासह घटनास्थळावरुन फरार झाला आहे. सदर ही घटना काही लोकांनी बघितले म्हणून गाडीची ओळख पटली आहे. पण नंबर लक्षात नाही. जवळ असलेल्या स्टाईलच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये फोरव्हिलर लक्षात येण्याची शक्यता आहे.







