एलसीबीची भुसावळ शहरात कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून भुसावळ शहरात एका तरुणाला गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि स्कार्पिओ कारसह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित मनोहर पवार असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. (केसीएन) त्यानुसार भुसावळ शहरातील नॉर्थ रेल्वे कॉलनी भागामध्ये सुभेदार रामजी आंबेडकर शाळेजवळ सुमित पवार हा त्याच्या ताब्यातील स्कॉर्पिओ कार (एमएच १९ सीवाय ३९७८) यामध्ये गावठी पिस्तूलसोबत एक जिवंत काडतूस घेऊन फिरत असताना दिसला. त्याच्याकडून ६ लाख ५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हेड कॉन्स्टेबल कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, संदीप चव्हाण, संघपाल तायडे, प्रवीण भालेराव, सचिन पोळ आदींनी केली आहे.