भुसावळ शहरात पोलिसांची कारवाई
भुसावळ शहरातील आलिशान वाटर पार्क परिसरामधील वीटभट्टी जवळ संशयित आरोपी निलेश अनंत पारधे (वय-२१, रा. छायादेवी राकानगर,भुसावळ) हा विनापरवाना गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतूस घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुरुवारी २९ मे रोजी दुपारी दीड वाजता कारवाई करत संशयित आरोपी निलेश पारधे याला अटक केली. त्याच्याकडून १७ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी निलेश पारधे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजीव सांगडे करीत आहे.