चोपडा तालुक्यात पुन्हा परजिल्ह्यातील तरुणाला पकडले
चोपडा (प्रतिनिधी) :- तालुक्यात शस्त्र सापडण्याचे प्रमाण सुरूच आहे. आता चोपडा शहर पोलीस स्टेशनने पुणे येथील तरुणाला गावठी पिस्तूल व २ काडतूस घेऊन जाताना चोपडा-शिरपूर रोडवर बंद टोल नाक्याजवळ अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी देखील चोपडा ग्रामीण पोलिसांनी लासूर रोडवर नगर, पुणे, सातारा, सांगली व इतर जिल्ह्यातील तरुणांना पिस्तूल घेऊन जाताना अटक करून कारवाई केली आहे.(केसीएन)आज गुरुवारी दि. २४ रोजी चोपडा शिरपूर रोडवर बंद टोल नाक्याजवळ संशयित आरोपी आकाश गणेश चव्हाण (वय २४, रा. तळेगाव दाभाडे पुणे ह. मु. वाल्मिक नगर पनवेल) हा दुचाकी क्रमांक एमएच १४ केएल ४३०३ ने गावठी बनावटीचे पिस्तुल (सिल्व्हर रंगाचा कट्टा) व पिवळसर रंगाचे दोन जिवंत काडतूस घेऊन जाताना मिळून आला. यावेळी आकाश चव्हाण याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आले आहे.
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (पवार) तसेच चोपडा उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि एकनाथ भिसे, पो.उ.नि. अनिल भुसारे, पो.उ.नि. जितेंद्र वालटे, पो.उ.नि. विजय देवरे, पो.उ.नि योगेश्वर हिरे, स.पो.उ.नि जितेंद्र सोनवणे, पोहेकों संतोष पारधी, पोहेको शिपी, पोहेकों ज्ञानेश्वर जवागे, पोना संदिप भोई,(केसीएन) पोको प्रकाश मथुरे, पोकों प्रमोद पवार, पोको विनोद पाटील, पोकों अमोल पवार, पोकों मदन पावरा, पोकों रजनिकांत भास्कर, पोकों अक्षय सुर्यवंशी, पोकों समा तडवी यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.