जळगाव ( प्रतिनिधी ) – पोलीस महानिरीक्षकांच्या नाशिकच्या विशेष पथकाने काल केलेल्या कारवाईत उमर्टि येथील आरोपीला ३० हजार रुपयांच्या गावठी कट्ट्यासह अटक केली
या पथकात पो नि बापू रोहम , स पो नि बशिर तडवी , हे कॉ रामचंद्र बोरसे , पो ना मनोज दुसाने यांचा समावेश होता ..आरोपी गुरजितसिंह अकबरसिंह बरनाला ( वय 36, रा.उमर्टि , ता.वरला , जि.बडवानी , मध्ये प्रदेश) याच्या ताब्यातून ३० हजारांचा गावठी कट्टा व २ हजारांचे एक मँगजीन जप्त करण्यात आले . आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले . या आरोपीच्या विरोधात
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन 0215/2021 घातक शस्रास्रे प्रतिबंधक कायदा कलम ३/ २५, ७/ २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.