जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
जळगाव (प्रतिनिधी):-शहरालगतच्या कुसुंबा आणि एअरपोर्ट रोड परिसरात गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि स्पोर्ट्स बाईकसह एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एअरपोर्ट रस्त्यावर एक तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. या माहितीनुसार, गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, विशाल कोळी आणि नितीन ठाकूर यांच्या पथकाने एअरपोर्ट जवळील तारा बिझनेस पार्क परिसरात सापळा रचला. २८ मार्च २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास एका पल्सर मोटारसायकलवर दोन संशयित येताना दिसले.
पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने शिताफीने पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता, कमरेला लावलेला एक गावठी कट्टा आणि खिशात ३ जिवंत काडतुसे मिळून आली.
पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे दीपक ठकुबा गुंजाळ (वय २८, रा. दुर्गानगर, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर), येथील विठ्ठल रंगनाथ सोनवणे (वय २५, रा. दुर्गानगर, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) त्यांना अटक. करण्यात आली आहे.
असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संशयितांनी हा कट्टा जळगावमधील तांबापुरा भागातील अजय बिरजू गारुंगे याच्याकडून घेतल्याची कबुली दिली आहे. अजय गारुंगे सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोउनि चंद्रकांत धनके आणि पोकॉ चेतन पाटील करत आहेत.








