चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – नागद रोडवरील झोपडपट्टीतील हातभट्टीवर आज चाळीसगाव शहर पोलीसांनी धाड टाकत ६० लिटर दारू नष्ट केली एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

नागद रोडवरील झोपडपट्टी पाण्याच्या टाकीजवळ हातभट्टी सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांना मिळाली. शहर पोलिसांनी ठिकाण गाठून ३,००० रूपये किंमतीची तयार ६० लिटर दारू दुपारी नष्ट करून ही हातभट्टी उद्ध्वस्त केली यावेळी रोषण सत्तार सैय्यद (रा. नागदरोड चाळीसगाव ) या आरोपींवर कारवाई करण्यात आली हि कारवाई चाळीसगाव शहर पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक बिरारी, पंकज पाटील व भगवान माळी आदींनी केली पो. कॉ. अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास भगवान माळी करीत आहेत.







