जळगाव (प्रतिनिधी ) – नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकासह फैजपुर पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत आज फैजपूर येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
आज ११ रोजी पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या पथकासह फैजपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत गावठी पिस्तूल विकत घेणाऱ्या गावठी कट्टा मधील आरोपी विशाल प्रकाश पाचपांडे वय 23,रा.गंगाराम प्लाँट म्युन्सीपल हायस्कुल मागे भुसावळ याला अटक केली आहे. एपीआय सिध्देश्वर आखेगांवकर, एएसआय बशिर तडवी,हेकॉ रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने राजेश ब-हाटे , किरण चाटे , चेतन महाजन , उमेश सानप आदींनी हि कारवाई केली आहे. आरोपीला कट्टा देणारा शिकलकर नाव माहित नाही रा.पार उमर्टी ता.वरला जि.बडवाणी ( मध्यप्रदेश) फैजपुर पो.स्टेला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून गावठी कट्टा 25,000/रु ,एक राऊन्ड 1000,/रु. मोटर सायकल 30,000, अशा एकुण 56,000/रु. तसेच पुढील कारवाई फैजपुर पो स्टे करीत आहे.