यावल तालुक्यातील पाडळसा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यातील पाडळसा गावाला सार्वजनिक जागी चौकात तलवार घेऊन दहशत करणाऱ्या एका तरुणाला फैजपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचारयांनी अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीतील पाडळसा गावाला कोसगाव जाणारे रोडवर हि घटना घडली. चौकामध्ये सार्वजनिक जागी सराईत गुन्हेगार प्रविण उर्फ डॉन गोपाळ तायडे (वय २८ वर्ष रा. पाडळसा ता. यावल) हा स्वताः जवळ लोखंडी धारदार तलवार बाळगुन गावात मोठमोठ्याने आरडा ओरड करुन दहशत निर्माण करीत होता. याबाबत सपोनि. निलेश वाघ यांना माहिती मिळाल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांसह जाऊन सदर इसमास ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ५०० रुपयांची लोखंडी तलवार जप्त केली आहे. सदर इसमावर फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हां दाखल करण्यात आला असुन अटक करण्यात आली आहे. सदर इसम याने त्याचे साथीदारासह दि. २७ फेब्रुवारी रोजी सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील चुनवाडे शेत शिवारातुन बकरी चोरी केल्याने सावदा पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल आहे. गुन्हां केल्यापासुन सदर इसम हा फरार होता.
सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ, परि. पोउपनिरी. विनोद गाभणे, पोहेकॉ. विकास सोनवणे, पोहेकों. मोती पवार, पोहेकॉ बाळु भोई, पो.कॉ. राहुल महाजन, चालक सहा. फौ. अरुण नमायते अशानी केली आहे. सदर इसम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यावर यापुर्वी चोरी, अपनयन, अवैध दारु विक्री व शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.