जळगाव (प्रतिनिधी) – औरंगाबाद येथील गॅस एजन्सीमधून 306 गॅस सिलेंडर घेऊन निघालेला ट्रक हा एमआयडीसीतील भारत गॅस कंपनीत पोहोचला असता, यात 12 गॅस सिलेंडर कमी आढळून आलेत. अज्ञात चोरट्यांनी हे गॅस सिलेंडर लांबविले असून त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, आयोध्यानगर येथील ट्रकचालक निवृत्ती पांडुरंग महाजन (वय-53) हे 21 मे रोजी औरंगाबाद येथुन नर्सिंग गॅस एजन्सी येथुन दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास मालट्रक क्रमांक (एम.एच.04,सी.पी.5567) मधून गॅस हंडी भरून निघाले. त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भारत गॅस येथे पोहोचले असता. गेट बाहेर ट्रक लावून घरी निघुन गेले. सकाळी 8 वाजता आले असता. ट्रकच्या मागील बाजुस असलेले फालके अधर्वट उघडलेले दिसले. बिलाप्रमाणे 306 गॅस हंड्यांपैकी 12 गॅस हंड्या कमी दिसल्या. 16 हजार 800 रूपये किंमतीच्या रिकाम्या गॅस हंड्या या घरगुती असून अज्ञात चोरट्यांनी 21 मे च्या सायंकाळी 6 ते 22 मेच्या सकाळी 8 वाजेपर्यंतच्या सुमारास भारत गॅस जवळील कंपाडजवळ लावलेल्या ट्रकमधून लंपास केल्या. याबाबत ट्रकचालक निवृत्ती महाजन यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ.विजय पाटील करीत आहेत.