• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गांधी रिसर्च फाउंडेशन संचलीत शाश्वत ग्रामीण पुनर्रचना विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास आरंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 17, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
गांधी रिसर्च फाउंडेशन संचलीत शाश्वत ग्रामीण पुनर्रचना विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास आरंभ

जळगाव  (प्रतिनिधी) – ‘महात्मा गांधीजींचे मूल्य जीवनात अनुसरा, सत्य, निष्ठा आणि परिश्रम यावर विश्वास ठेवा आणि ग्राम विकासात आपले मोलाचे योगदान करा.’ असे आवाहन प्रो. लीला वसारिया यांनी विद्यार्थ्यांना केले. गांधी रिसर्च फाउंडेशन संचलीत शाश्वत ग्रामीण पुनर्रचना विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास आज जैन हिल्स येथे एका छोटेखानी कार्यक्रमात आरंभ झाला. त्यावेळी त्या उद्घाटक म्हणून उपस्थितांशी संवाद साधत होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर अशोक भार्गव, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदर्शन आयंगार आणि सौ. अंबिका जैन उपस्थित होते.

गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी अनिलेश जगदाळे यांनी साने गुरुजींची रचना ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे…’ सादर केली. या अभ्यासक्रम आरंभ उद्घाटन आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. सामान्यपणे पाहुणे व मान्यवरांच्याहस्ते एक समयी प्रज्ज्वलीत करण्याची रिती आहे. पाहुण्यांसह या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात दीपक देण्यात आला होता व ज्योतीने ज्योत पेटवून अनेक दिवे प्रज्ज्वलीत झाले. यावेळी ‘ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो…’ या गाण्याचे मंद स्वर भारलेले वातावरण निर्माण करून गेले. आरंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाबाबतची पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे डॉ. आश्विन झाला यांनी माहिती देऊन संस्थेचा परिचय करून दिला.

कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे अशोक भार्गव यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. प्रगती साध्य करणाऱ्या जपानच्या कौटुंबीक आणि एकटेपणाने जगणाऱ्यांच्या समस्या सांगितल्या. कामाच्या तणावात तरुण लग्न न करता एकटे राहणे पसंत करतात व त्यामुळे त्यांच्या लोकसंख्येवर विपरीत परिणाम होत आहे एका वेगळ्याच प्रश्नांना जपान सामोरी जात आहे. अशा वेळी महात्मा गांधीजींचे तत्त्व उपयुक्त ठरतात असे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान व अनुभवाचा सुयोग्य वापर करून प्रगतीमध्ये आपला वाटा उचलावा असे सांगितले. भार्गव यांनी त्यांच्या सुमधूर आवाजात ‘आसमां पे हे खुदा और जमी पे हम….’ आजच्या परिस्थितीचे वास्तव सांगणारे गाणे म्हटले. यावेळी सुदर्शन आयंगार आणि अंबिका जैन यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मिश्रा यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांसह गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते.

Photo caption 6018a – गांधी रिसर्च फाउंडेशन संचलीत शाश्वत ग्रामीण पुनर्रचना विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रो. लीला वसारिया, व्यासपीठावर अंबिका जैन, डॉ. सुदर्शन आयंगार आणि अशोक भार्गव


 

Tags: #gandhi risarch foundetion #jalgaon #maharashtra #bharat#jain #jainirrigationjalgaon
Previous Post

उचलच्या पैशांच्या कारणावरून ऊसतोड मुकादमला डांबून ठेवले !

Next Post

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल भुसावळमध्ये विठूनामाचा टाळमृदंगात गजर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल भुसावळमध्ये विठूनामाचा टाळमृदंगात गजर

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल भुसावळमध्ये विठूनामाचा टाळमृदंगात गजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon