गुढे.ता.भडगांव (प्रतिनिधी) – गणेशपूर माध्यमिक विदयालयाचे कनिष्ठ लिपिक निलेश पांडुरंग राजपूत(महाराज) यांची श्री राष्ट्रीय राजपूत करनी सेनचे चाळीसगाव शहराच्या वरिष्ठ शहराध्यक्षपदी नुकतीच सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्या प्रित्यर्थ त्यांचा गणेशपूर विदयालयात नुकताच वरिष्ठ लिपिक टी.जी.ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक पी.एस.पाटोळे,पर्यवेक्षक एस.डी.महाले व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.








