जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली येथील ५० वर्षीय प्रौढांच्या मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली .
संजय नारायण मिस्त्री (वय ५० , रा. शिरसोली ) हे वेल्डिंग मिस्तरी काम करून उदरनिर्वाह करतात. बुधवारी रात्री कुटुंबीयांसह जेवण करून ते वेल्डिंगच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपले. मध्यरात्री त्यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी त्यांचा मुलगा नितीन पाणी तापवण्यासाठी हिटर सुरु करायला गेला तेंव्हा लक्षात आला. त्यांच्या पश्चात पत्नी सविता व राकेश आणि नितीन हे दोन मुले तर विवाहित मुलगी प्रियंका असा परिवार आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.