जळगाव ( प्रतिनिधी ) तालुक्यातील खेडी कडोली येथील २३ वर्षीय तरुणाने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली असून याघटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मयूर नंदूलाल पाटील वय-२३ रा. खेडी कडोली असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
मयूर हा शेती काम करीत असून आज 1 फेब्रुवारी रोजी घरी कोणीही नसताना गुरांच्या गोठ्यात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी घरातील नातेवाईक गोठ्यात गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता हा प्रकार लक्षात आला. यावेळी त्याचे आई, वडील यांनी मुलाचा मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला होता. शेजारच्या नातेवाईकांनी खाली उतरून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नातेवाईकांनी आक्रोश केला होता. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.मयुर पाटील यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.