हुंडा आणि चारित्र्याच्या संशयावरून सासरच्या मंडळींनी खून केल्याचा आरोप
जळगाव (प्रतिनिधी ) ;-शहरातील राधाकृष्ण नगर भागात राहणाऱ्या एका २० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून सासरच्या मंडळींनी हुंडा आणि चारित्र्याच्या संशयावरून तिला मारल्याचा आरोप मयत विवाहितेच्या पित्याने केला आहे. दुर्गा शेखर गायकवाड वय २० असे विवाहितेचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , दुर्गा शेखर गायकवाड हिचे खानावळ चालक शेखर गायकवाड यांच्याशी २३ डिसेंबर २०२० रोजी विवाह झाला होता. विवाहितेच्या घरासमोर जेठ आणि जेठाणी समोर राहतात. आज दुपारी वडील मालवाहू रिक्षाचालक दत्तू पाटील रा. प्रजापती नगर ,जळगाव यांना एका व्यक्तीचा फोन आला कि, तुमची मुलगी आजारी आहे. असे सांगितल्यावरून वडील दत्तू पाटील आणि भाऊ पुरुषोत्तम पाटील यांनी राधाकृष्ण नगर गाठले . मात्र सासरच्या मंडळींनी दोर कापून तिला जमिनीवर ठेवल्याचे आढळून आले. मात्र आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली असल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. घटनास्थळी सहाय्य्क अधीक्षक कुमार चिंथा , शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक धनराज येरुळे यांनी भेट दिली. . दरम्यान मयत दुर्गा गायकवाड हिचा चारित्र्याच्या संशयावरून छळ होत असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. जिल्हा रुग्णालयात मृतदेह शविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. याबाबत शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.