पारोळा तालुक्यातील आंबापिंप्री येथील घटना


पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील आंबापिंप्री येथील तरुणाने शेतात झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना मंगळवारी दि. ३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पारोळा पोलिसांत हरी दौलत लांडगे यांनी खबर दिली आहे.
योगेश सीताराम लांडगे (२८) असे मयत तरुणाचे नाव आहे. गावात तो परिवारासह राहत होता. हरी लांडगे हे मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतीकामासाठी शेतात गेले असता त्यांचा चुलत भाऊ योगेश सीताराम लांडगे याने शेतात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती कळताच गावातील लोक व नातेवाइकांनी उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले.
तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









