जळगाव (प्रतिनिधी ) ;- राज्याचे राष्ट्रवादीचे माजी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे नुकतेच निधन झाले असून आज ५ रोजी सायंकाळी राष्ट्रवादीच्या आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात शोकसभेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. यात खा. सुप्रियाताई सुळे, हुसेन दलवाई , नवाब मलिक , एकनाथराव खडसे आदींसह विविध राजकीय पक्ष आणि संघटनेच्या राज्यभरातील नेत्यांनी हाजी गफ्फार मलिक यांच्या कार्याला उजाळा देऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे,जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील ,प्रतिभा शिंदे, माजी आमदार मनीष जैन, , एजाज मलिक , जिल्हा परिषद सदस्य अशोक लाडवंजारी , आदी उपस्थित होते.