जिल्ह्यात ४३ हजार ४९८ नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस विक्री होणे बाकी
जळगाव ;- शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केलेला असल्यामुळे भारतीय कपास निगम लिमीटेड या महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादीत यांचे मार्फत करण्यात येणारी कापूस खरेदी दिनांक 22मार्च ते 23एप्रिल या कालावधीत बंद होती. भारतीय कपास निगम लिमीटेड व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ मर्यादीत यांनी दिनांक 24एप्रिल पासून राज्यात कापूस खरेदीस पुन्हा प्रारंभ करण्यात आलेला
आहे. लॉकडाऊनमुळे शेतक-यांना ब-याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. जळगांव जिल्हयातील अद्यापही बहुतांश शेतक-यांकडे लॉकडाऊनमुळे कापूस विक्री साठी शिल्लक आहे. दिनांक 22 मे, 2020 अखेर जळगांव जिल्हयातील 48,391 कापूस उत्पादक शेतक-यांनी कापूस विक्री साठी कृपी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केलेली असून आज अखेर 4,893 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापसाची विक्री केली असून अद्यापही 43,498 नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस विक्री होणे बाकी आहे. | आणि ज्याअर्थी, लबकरच पावसाळा सुरु होणार असून जळगांव जिल्हयातील कापूस उत्पादक शेतक-यांकडे
नेमका किती कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे, याचा निश्चित अंदाज बांधता येत नाही, त्यामुळे जळगांव जिल्हयातील कृषी
उत्पनन् बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या शेतक-यांकडे प्रत्यक्षात विक्रीसाठी किती कापूस शिल्लक आहे अगर कसे? याची
तपासणी करावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज काढले आहेत .
यात म्हटले आहे कि , ज्याअर्थी, राज्यात कापूस खरेदीचे बाजार मुल्य दर ब शासनाचे हमीभाव दर यामध्ये तफावत असून कापूस खरेदीचे शासनाचे हमीदर हे बाजारमुल्य दरापेक्षा जास्त असल्यामुळे जळगांव जिल्हयातील काही व्यापारी हे शेतक-यांच्या माध्यमातून कापूस विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जळगांव जिल्हयाबाहेरील व्यापारी व शेतकरी सुध्दा जळगांब जिल्हयात प्रवेश करुन जिल्हयातील कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्री करीता घेऊन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब सदर बाबींवर नियंत्रण ठेवणे ब जळगांव जिल्हयातील प्रत्यक्ष कापूस उत्पादक शेतक-यांचाच कापूस शासन हमी भावाने खरेदी व्हाबी याकरीता योग्य तपासणी करणे गरजेचे आहे.
1) जळगांव जिल्हयातील सर्व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनी त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असलेलया कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून कापूस विक्री साठी नोंदणी केलेल्या कापूस उत्पादक शेतक-यांच्या गाव निहाय याद्या शेतक-यांचे नाव, गट / सर्वे क्रमांक, मोबाईल क्रमांक, संपूर्ण पत्ता यांच्यासहीत प्राप्त करुन घ्याव्यात. याकामी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी सहायक निबंधक, सहकारी संस्था यांना तात्काळशेतक-यांच्या याद्या पुरविण्याकरीता आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. सदरील गाव निहाय याद्यांची पडताळणी करुन त्या याद्या संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडेस सादर करावी. तहसिलदार यांनी आवश्यक ते नियोजन करुन तलाठी / ग्रामसेवक / कृषी सहायक यांना प्रत्येकी गाव निहाय याद्यांचे वाटप करावे.संबंधित तलाठी / ग्रामसेवक / कृषी सहायक यांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या गाव निहाय याद्या प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर / स्थळी जाऊन संबंधित नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतक-यांकडे कृषी ] उत्पन्नबाजार समितीमध्ये विक्री करण्यासाठी प्रत्यक्षात किती कापूस शिल्लक आहे, याची तपासणी करावी. सदर तपासणी करीत असतांना उपलब्ध असलेलया 7/12 उता-यावरील कापूस पिकाखाली एकूण क्षेत्राची नोंदीवरुन खात्री करावी. तसेच प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलेल्या कार्यवाहीचा उपस्थितांच्या स्वाक्षरीने पंचनामा करावा, शक्य झाल्यास प्रत्यक्ष जागेवर असणा-या कापूस साठ्याचे संबंधित शेतक-यासह मोबाईलद्वारे फोटो घ्यावेत. संबंधित तलाठी / ग्रामसेवक / कृषी सहायक यांनी त्यांना नेमून दिलेल्या गाव निहाय यादी प्रमाणे प्रत्यक्ष जागेवर जाऊन नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतक-यांकडे प्रत्यक्षात किती कापूस शिल्लक आहे याची तपासणी / पंचनामा करण्याची कार्यवाही दोन दिवसांत तात्काळ पूर्ण करावयाची आहे तसेच सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ प्रमाणे केलेल्या कामाचा दैनंदिन अहवाल तहसिलदार यांना सादर करावा.
5) गाव निहाय तपासणी / पंचनामा झालेल्या यादी पैंकी प्रत्येकी 10 % याद्यांची फेर तपासणी संबंधित
तालुक्यातील तहसिलदार / गट विकास अधिकारी / तालुका कृषी अधिकारी यांनी करावी. अशा प्रकारे प्रत्यक्षात
तपासणी / पंचानामा केलेल्या गाव निहाय याद्या संबंधित तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहायक
निबंधक, सहकारी संस्था यांच्या ताब्यात पुढील कार्यवाहीसाठी द्याव्यात.
6) तालुक्यातील सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनी तपासणी / पंचनामा झालेल्या यादी प्रमाणे संबंधित कृषी
उत्पन्न बाजार समितीमार्फत यादीत नमूद शेतक-यांचा कापूस प्राथम्याने खरेदी केला जाईल याची गांभिर्याने दक्षता
घ्यावी, जेणे करुन शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापा-यांनी खरेदी केलेला कापूस बाजार समितीत विक्रीसाठी
येणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.
7) सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी त्यांचेकडील नोंदणीकृत शेतक-यांची कापूस खरेदी प्रथम येईल त्यास प्रथम
प्राधान्य या तत्वा प्रमाणे करावी. याबाबत कोणतीही तक्रार येणार नाही, यासाठी
सर्व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
8) वर नमूद केल्यानुसार सर्व तहसिलदार व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनी तात्काळ प्रभावाने कार्यवाही
सुरु करुन सोबत जोडलेल्या परिशिष्ट-ब प्रमाणे दैनंदिन अहवाल जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगांव
यांचेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव यांना सादर करावा.