जळगाव (प्रतिनिधी) एका १६ वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना तालुक्यातील म्हसावद येथे उघडकीस आली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, म्हसावद येथे १६ वर्षीय मुलाला १५ जुलै रोजी दुपारी ११ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा प्रकार घडल्याची तक्रार मुलाच्या आजीने २७ रोजी सायंकाळी एमआयडीसी ठाण्यात दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ स्वप्नील पाटील करीत आहे.