जळगाव (प्रतिनिधी ) ;- शौचास जाते असे सांगून घराबाहेर पडलेल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले. ही घटना दि. १४ जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील तरुण शेतमजुरीसाठी शहरात आपल्या कुटुंबियांसह स्थायिक झाला होता. दि. १४ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याची बारा वर्षाची मुलगी ही घरातून शौचास जावून येते असे सांगून घराबाहेर पडली. बराच वेळ झाला तरी ती घरी न परतल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र तरी देखील ती मुलगी मिळून न आल्याने अखेर त्यांनी दि. १६ रोजी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर हे करीत आहे.