जळगावात फुले मार्केट येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सेंट्रल फुले मार्केट येथील ३ दुकाने फोडून ३५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी दि. २९ मे रोजी पहाटे ३ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सेंटर फुले मार्केट येथील मैत्री कलेक्शन तसेच प्रणाली लेडीज टेलर आणि श्रीराम ड्रायफ्रूट्स हे तीन दुकानाचे शटर उचकावून चोरटयांनी प्रवेश करत रोकड आणि काही मुद्देमाल असा एकूण ३५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दि. २९ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मैत्री कलेक्शनचे मालक किरण विठ्ठल कुंभार रा. तरसोद तसेच इतर दुकानांचे मालक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात चोरी झाल्याबाबत तक्रार देण्यात आली. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती पोलीस नाईक योगेश पाटील हे करीत आहे.