जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील फुले मार्केटमधून अज्ञात चोरटयांनी कुलूप तोडून आत प्रवेश करून १ लाखांच्या रोकडसह दोन सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि
विकास प्रकाशलाल मकडीया वय 33. धंदा व्यापार रा. प्लाट 11 गणेश नगर बाब हरदास राम मंगल कार्यालया जवळ आकाशवाणी केंद्राच्या मागे यांचे
फुले मार्केट येथे दृष्टी जनरल सौंदर्यप्रसाधने नावाचे स्टोर दुकान नं37 सेंटर फुले मार्केट हे असून २६ जानेवारी रोजी त्यांनी दुकानामध्ये चार पाच दिवसा मध्ये माल विक्रीचे जमा झालेले एकुण रु 1,02,000 /- रुपये दुकानातील ड्रॉवर मध्ये ठेवलेले होते. आज २७ रोजी सफाई कर्मचाऱ्याला ष्टर्चे कुलूप तोडल्याचे लक्षात आल्याने त्याने विकास माकडिया यांना हि माहिती दिली . दुकानाचे बाहेर लावलेल CCTV एख कॅमेरा काढुन घेवुन गेलेले आहे . बाजूला असणारे सी. एस. जनरल स्टेअर नावाचे दुकानाचे 02 कॅमेरे काढुन चोरुन नेले आहे. याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.