भुसावळ ( प्रतिनिधी ) – सीम कार्डचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका ५५ वर्षीय व्यक्तीच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवत अज्ञात व्यक्तीने बँक खात्यातून ऑनलाईन पैसे काढत ३४ हजाराची फसवणूक केली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरनाम परचामल बठेजा ( वय ५५ रा. सिंधी कॉलनी भुसावळ ) यांना २० डिसेंबररोजी सकाळी ८ वाजता मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यांनी सांगितले की तुमच्या मोबाईल सीम कार्ड केवायसीची मुदत संपली आहे. तुमचा नंबर चालू ठेवण्यासाठी मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून दहा रूपयाचा रिचार्ज करा असे सांगितले बठेजा यांनी ॲप डाउनलोड केले.नंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाइलवर नियंत्रण मिळवत त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने ३४ हजार २६६ रूपये काढून घेतले. हरनाम बठेजा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश धुमाळ करीत आहेत .