जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथीक महाविद्यालयाच्या २०२४-२५ या नव्या शैक्षणिक बॅचची फ्रेशर्स पार्टी मोठ्या जल्लोषात करण्यात आली. यावेळी गत वर्षात निकालात दैदिप्यमान यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथीक महाविद्यालयातर्फे डॉ. केतकी पाटील सभागृहात फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रमुख पाहुणे हृदयविकार तज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. हर्षल बोरोले, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, होमीओपॅथीक महाविद्यालयाचे डॉ. राकेश मिश्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. डी.बी. पाटील, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाख गणवीर, डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादर, डॉ. पंकज शर्मा, डॉ. अमोल चोपडे, डॉ. श्वेता डांगरे, डॉ. कुणाल फेगडे, ललित महाजन, तारकेश भंगाळे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, धार्मिक प्रार्थना, गु्रप व एकक नृत्य तसेच शायरीसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. तसेच गत शैक्षणिक वर्षात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार राहूल बारस्कर,नमीता फस्से,श्रेया गवई,शशांक सहारे,यांनी मानले. यशस्वीतेसाठी होमीओपॅथी महाविद्यालयाचे डॉक्टर,प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.