जळगाव ( प्रतिनिधी ) – नवीपेठेतील हस्ती सुगंध कंपनीने नाशकातील अगरबत्ती कंपनीचा नोंदणीकृत लोगो वापरून फसवणूक केल्याचे उघडकीला आले आहे. शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीपेठेतील मे. हस्ती सुगंधी दुकानदाराने नाशिक येथील हकिकुल्लाह हाफीज उल्लाह खान (वय-३३, रा. नाशिक ) यांच्या रिलॅक्सो नाशिक या कंपनीच्या ट्रेड मार्कचा अनधिकृत वापर करून अगरबत्ती विक्री केली . हा प्रकार ८ सप्टेंबर २०१९ ते २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुरू होता. हकिकुल्लाह हाफीज उल्लाह खान यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी २७ नोव्हेंबर रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अमिशा नयन शाह, नयन दिनेशकुमार शाह आणि मे. हस्ती सुगंधिचे मालक (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि जगदीश मोरे करीत आहेत .







