• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील उद्योजकाची साडेआठ लाखात फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

छत्तीसगडच्या तिघांविरूध्द गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : टायर रिमोल्डींग मशिन बनविण्याची कंपनी असल्याचे सांगत जळगावातील योगेश गोविंद चंदनकर (वाणी) (वय ५२, रा. शिव कॉलनी) या उद्योजकाकडून ८ लाख ६१ हजार ७५० रुपये घेऊन त्यांना नवीन मशिन न देता व जुन्या मशिनची दुरुस्तीही करून न देता त्यांची फसवणूक केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर योगेश चंदनकर यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार मड्डू रामाराव भास्कर, नयन सिंग, अचल सिंग (सर्व रा. भिलाई, छत्तीसगढ) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शिवकॉलनीत वास्तव्यास असलेले योगेश चंदनकर यांची औद्योगिक वसाहत परिसरात टायर रिमोल्डींगची कंपनी आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये छत्तीसगढ राज्यातील भिलाई येथील रवी इंजिनिअरिंग कंपनीचे मडू रामाराव भास्कर हे व्यावसायिक भेटीसाठी चंदनकर यांच्या कंपनीत आले होते. टायर रिमोल्डींग मशीन बनविण्याची कंपनी असल्याचे त्यांनी चंदनकर यांना सांगत काही मागणी असल्याबद्दल विचारणा केली. त्यानुसार त्यांनी जुनी मशिन घेऊन नवीन मशिन विकत देण्याविषयी सांगितले. तसेच इतर जुन्या पाच मशिन दुरुस्तीविषयीदेखील भास्कर याला सांगण्यात आले.

त्याने तसे कोटेशन पाठविले. त्यामुळे चंदनकर यांनी स्वतःच्या खात्यासह मुलांच्या खात्यावरून भास्कर यांच्या खात्यावर एकूण ८ लाख ६१ हजार ७५० रुपये ट्रान्सफर केले होते. एवढी मोठी रक्कम देऊनही नवीन मशिन मिळाले नाही. तसेच अगोदरचे मशीनही दुरुस्त करून न मिळाल्याने चंदनकर यांनी भास्कर याच्यासह त्यांचे व्यवस्थापक नयन सिंग व अचल सिंग यांच्याशी संपर्क साधला. मात्र ते उडवाउडवीचे उत्तरे देत होते, तसेच त्यानंतर त्यांनी कॉल घेणेही बंद केले.

फसवणुकीची खात्री होताच दिली तक्रार संबंधितांकडून उडवाउडवीच्या उत्तरांसह कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने योगेश चंदनकर यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. त्यांनी लागलीच या विषयी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मड्डू रामाराव भास्कर, नयन सिंग, अचल सिंग या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaonfraud crime
Previous Post

विचार वारसा फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबीर

Next Post

अनेर नदी ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात बैलजोडी गेली वाहून

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनेर नदी ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात बैलजोडी गेली वाहून

अनेर नदी ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात बैलजोडी गेली वाहून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon