जळगावच्या सायबर पोलीस स्टेशनची हरियाणा येथे कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शेअर ट्रेंडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शहरातील एका प्राध्यापक महिलेची १ कोटी रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाली होती. दरम्यान, महिलेच्या बँक खात्यावरून पैसे काढणाऱ्या दोन संशयित आरोपीना अटक करण्यात आलेली आहे. जळगाव सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी हरियाणा राज्यात जाऊन त्यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जळगाव शहरातील एका प्राध्यापक महिलेला दि. १६ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान एका व्हाट्स अपच्या ग्रुपवर अज्ञात आरोपींनी जोडले होते. यात अंजली मोबाईल, जय मोबाईल, डॉ. बेहरुज यांनी मेसेज पाठवून ट्रेंडिंगमध्ये रक्कम गुंतविण्यास सांगितले. (केसीएन)त्यानंतर या फिर्यादी महिलेकडून संशयित आरोपींची महिलेसह तिच्या पतीचे, नणंदेच्या व सासूच्या खात्यावरून वेळोवेळी १ करोड ५ लाख २३ हजार ३४१ रुपये स्वीकारले. तसेच महिलेची आर्थिक फसवणूक केली. तसेच, रक्कम न भरल्यास विविध प्रकारे धमकी दिली.
यानंतर प्राध्यापिकांनी जळगाव सायबर पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू होता. दरम्यान, पोलिसांनी धागा गवसताच महिलेच्या बँक खात्यावरून पैसे काढणाऱ्या दोन संशयित आरोपीना हरियाणा राज्यात जाऊन अटक केली आहे. मुकेश सुभाष (वय २६), अंकुश सतपाल (वय २७, दोघे रा. नाधोरी ता. भुना जि. फतेहबाद, हरियाणा) (केसीएन)अशी त्यांची नावे आहे. या गुन्ह्यात यापूर्वी २ संशयितांना अटक करण्यात आलेली होती. आता अजून दोघांना अटक झाली आहे. सदरची कारवाई हि पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हेड कॉन्स्टेबल दिलीप चिंचोले, शिवनारायण देशमुख, कॉन्स्टेबल दीपक सोनवणे यांनी केली आहे.