जळगाव (प्रतिनिधी ) ;-फ्रिडम ग्लोबल रिसर्च कन्सल्टन्सी शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींपैकी एकाला एमआयडीसी पोलिसांनी २६ रोजी इंदौर येथून अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्याच्या इतर मल्होत्रा आणि दिलीप मिश्रा या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे.
अयोध्या नगरात राहणारे शाम सटोले वय ४० यांना शेअर मार्केटमधून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून २ लाख ३५ हजार ५७७ रुपयांची फसवणूक केली होती . याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संदिप विवेककुमार भारद्वाज (32) रा. 203, सिंघेश्वर अपार्टमेंट सिंगापूर टाऊनशिप इंदोर (मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पो हे कॉ गफुर तडवी ,पो कॉ शांताराम पाटील आदींनी इन्दौर येथे जावुन ताब्यात घेतले .याबाबत आरोपी इंदौर येथे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यानां मिळाली होती . त्यावरून त्यास ताब्यात घेण्यात आले . आरोपीला न्यायालया समोर हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी मिळाली असुन त्याचेकडुन संपुर्ण मुद्देमाल रक्कम हस्तगत करण्यात आला आहे. पुढिल तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक अमोल मोरे व पो हे कॉ रतीलाल पवार करत आहेत.