पॅरिस ( वृत्तसंस्था ) ;- पारंपारिक ऊर्जा साधनांवरील भार कमी करुन स्वच्छ आणि पर्यावरणपुरक मार्गाने ऊर्जानिर्मिती करण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. अशाच एका प्रयत्नामध्ये फ्रान्सने जगातील सर्वात शक्तीशाली चुंबक तयार केलं आहे. फ्युजन रिअॅक्टरसाठी हे चुंबक तयार करण्यात आलं आहे. सूर्य ज्या पद्धतीने ऊर्जा निर्माण करतो त्याच पद्धतीने ऊर्जानिर्मितीसाठी हा चुंबकाचा वापर केला जाणार आहे.
इंटरनॅशनल थर्मोमॉलिक्युलर एक्सपिरिमेंटल रिअॅक्टर (आयटीईआर) या जगातिक स्तरावरील प्रकल्पामध्ये हे चुंबक वापरलं जाणार आहे. आयटीईआरमध्ये सूर्यामधील ऊर्जा निर्मितीप्रमाणे ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रयत्न सेंट्रल सॉलेनॉइडच्या नावाच्या या चुंबकाच्या मदतीने केला जाणार आहे. हे चुंबक इतकं शक्तीशाली आहे की ते एखाद्या विमानवाहू युद्धनौकेला ६ फुटांपर्यंत उचलू शकतो. हे लोकचुंबक फ्रान्समधील केंद्रीय ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असणार आहे.