जळगाव (प्रतिनिधी) :- येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत अँटी-रॅगिंग सप्ताह नुकताचा संपन्न झाला. या निमीत्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धा व विजेते :- १२ ऑगस्ट रोजी रांगोळी स्पर्धा से नो रॅगींग प्रथम सिद्धी गीते, अदिती भालेराव, द्वितीय साक्षी इंगळे, स्नेहल भोयर, तृतीय भारतो शेळज, वैश्नवी केंद्रे, वैश्नवी गीते, रुतुजा शार्दूल, महविश शेख, साक्षी भामरे १३ रोजी लोगो डिझायनिंग स्पर्धा (अँटी-रॅगिंग जनजागृती) प्रथम दामिनी तावडे, द्वितीय हर्षदा चौधरी, तृतीय शश्वंत नाफडे १४ ऑगस्ट सेल्फी पॉईंट मेकिंग रॅगींग विरोधात उभे रहा,प्रथम दिशाली, श्रावणी, अश्विनी, राधिका, साक्षी, खुशी, अनाम, सानिका, चंदन, हमजा, दिव्या, द्वितीय आतुफा, डिया, कुलदीप, नंदिनीख तृतीय प्रतीक्षा, साक्षी, पवन, आशिष १५ ऑगस्ट अँटी-रॅगिंग जनजागृती रॅली यात सर्व विद्यार्थ्यांनी फलक व घोषवाक्यांसह जनजागृती केली. १८ ऑगस्ट रील स्पर्धा (थीम: अँटी-रॅगिंग जनजागृती, सर्जनशीलता व सकारात्मकता) प्रथम ऐक्यं बॅच,द्वितीय ,अरायझन बॅच, तृतीय पारितोषिक – अतरंगी बॅच आठवडाभर चाललेल्या अँटी-रॅगिंग उपक्रमांत सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. जयवंत नागुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. रिया अग्रवाल यांच्या समन्वयातून यशस्वीरीत्या साजरा करण्यात आला.