वडती ता. चोपडा प्रतिनिधी :– मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे , सर्वसामान्य जनता आर्थिक विवनचनेत असून सुद्धा काही शैक्षणिक संस्थान मार्फत विद्यार्थ्यांना फी करीता तगादा लावण्यात येत आहे , त्या मुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फेत ,सक्तीच्या फी वसुली करणाऱ्या शाळा विरोधात तहसीलर अनिल गावित यांना आज निवेदन देण्यात आले .
चोपडा तालुक्यातील काही शाळा शैक्षणिक संस्था शैक्षणिक फी ,देणगी ,यासह विविध प्रकारच्या फी ची आकारणी करून त्याची सक्तीने वसुली करीत असून पालकांना वेठीस धरून विद्यार्थी वर्गास मानसिक त्रास देत आहेत ,फी न भरल्यास त्यांचे निकाल ,दाखले ,अडवून त्यांना शिक्षण सुविधेपासून वंचित ठेवण्याचा दम भरत आहेत .वास्तविक महाराष्ट्र शासनाने कोरोना काळात राज्यातील सर्वच शैक्षणिक संस्थांना परिपत्रक काढून जे उपक्रम /सुविधा राबवल्या जात नसतील ,पुरवल्या जात नसतील ,अशी कोणतीही फी न आकारता आणि त्यासाठी त्यांची अडवणूक न करता विद्यार्थ्यांना ऑन लाईन शिक्षणा पासून वंचित ठेवू नये ,अशा सूचना दिल्या आहेत ,तशा तक्रारी आल्यास सदर शाळांच्या मान्यता तसेच संलग्नता प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य शासनास पाठवण्यात येईल अशा स्पष्ट सूचना परिपत्रकाद्वारे दिलेल्या आहेत, त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ,चोपडा तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले . संबंधित मागणी वर तात्काळ योग्य कारवाही न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला,
या वेळेस मनसे विद्यार्थी शहराध्यक्ष निलेश बारी ,रस्ते आस्थापना तालुकाध्यक्ष अजय परदेशी ,जनहित तालुकाध्यक्ष गणेश बेहरे ,निखिल पाटील ,दीपक विसावे ,विक्की माखिजा ,सनी पाटील ,विवेक मराठे ,मनोज पाटील ,महेश चौहान ,राकेश धनगर ,व्यंकटेश पवार ,महेश पाटील,निलेश पाटील ,रुपम पालीवाल ,शुभम गुर्जर ,शुभम महाजन,आदी उपस्थित होते