भाजप महानगरची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जळगावकरांसाठी कोरोना लस मोफत तसेच लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र लशींचा तुटवडा भासत असल्याने इतर महापालिकांप्रमाणे मनपाने देखील निविदा काढून जळगावकरांसाठी लस खरेदी करून उपलब्ध करून देण्याची मागणी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी ,भगत बालाणी, धीरज सोनवणे, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.