• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सर्पदंश झालेल्या बालिकेला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले “शावैम” मध्ये वैद्यकीय यंत्रणेचे प्रभावी यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव : बऱ्हाणपूर येथील दहा वर्षीय बालिकेला घरी झोपलेली असताना सर्पदंश झाल्यामुळे वैद्यकीय उपचार सुरु झाले. मात्र प्रकृती खालावल्याने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तब्बल ३४ दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर बालिकेचा जीव वाचून तिला डिस्चार्ज देण्यात यश मिळाले आहे. यामुळे बालिकेच्या परिवाराने रुग्णालयातील यंत्रणेचे आभार मानले.

मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर शहरात राहणाऱ्या १० वर्षीय बालिकेला १७ जानेवारी रोजी अतिजहाल सर्पाचा दंश झाल्याने तिची तब्येत बिघडली होती. स्नायू कमजोर होऊन श्वास थांबत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवलेलं होते. नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी जळगावच्या शासकीय रुग्णालयात १८ जानेवारी रोजी संध्याकाळी तिला उपचारकरीता दाखल केले. बालरोग व चिकित्सा शास्त्र विभागातील तज्ज्ञांनी तिची तपासणी केली असता उजव्या पायाच्या पंजाला दंश झाल्याने मोठी सूज आलेली होती. दम लागत होता.

तत्काळ तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सूज वाढत असल्याने तिच्या शरीरावर पोटात रक्तस्राव होणे आदी दुष्परिणाम सुरु झाले होते. तिला अँटिबायोटिक आणि इतर औषधी सुरु झाली. या गुंतागुंतीच्या उपचाराच्या दहाव्या दिवशी सकारात्मक लक्षणे दिसू लागल्यावर शल्यचिकित्सा विभागाने “स्किन ड्राफ़टींग” हे अद्ययावत उपचार यशस्वीरीत्या केले. यात पायाची दंश झालेली जागा खराब झाल्यामुळे मांडीची कातडी काढून तिला पायाच्या ठिकाणी ट्रान्सप्लांट करण्यात आली. यानंतर बालिकेच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली.

अखेर २२ फेब्रुवारी रोजी ३४ व्या दिवशी तिला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्या उपस्थतीत डिस्चार्ज देण्यात आला. बालिकेवर बालरोग विभाग, औषधवैद्यक शास्त्र, शल्यचिकित्सा शास्त्र विभागाच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वी उपचार करून जीवदान देण्यात यश आले. यासाठी शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. मिलिंद चौधरी, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. गिरीश राणे, डॉ. बालाजी नाईक, डॉ. मानसा सी., डॉ. अतुल गाजरे, डॉ. नीलांजना गोयल, डॉ. जयश्री गिरी, डॉ. विश्वा भक्ता यांनी परिश्रम घेतले.

एरंडोल येथील घटना दुर्दैवी; दुर्घटना घडल्यास तत्काळ उपचारासाठी येणे महत्वाचे

बऱ्हाणपूर येथील बालिकेचा जीव वाचविण्यात आमच्या यंत्रणेला यश आले. यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांची साथ बालिकेला लाभली. दोन दिवसांपूर्वी एरंडोल येथे १७ वर्षीय युवतीला सर्पदंश झाल्यावर तिला दवाखान्यात नेण्याऐवजी देवस्थानात नेण्यात आले. त्यात तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वेळेवर आणले असते तर बऱ्हाणपूर येथील बालिकेप्रमाणे हि युवती देखील वाचू शकली असती. कुठलीही दुर्घटना घडल्यास रुग्णाला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी आणले पाहिजे.

– डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव


 

 

Previous Post

संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारताला परत न देणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला खेळू देणार नाही

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारताला परत न देणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला खेळू देणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon