• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा रुग्णालयातील शिस्त, नियोजन पाहून पालकमंत्री प्रभावित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 8, 2021
in Uncategorized
0

 

ना. गुलाबराव पाटील यांनी “शावैम” मधील आरोग्य यंत्रणेचे केले कौतुक

जळगाव :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा परिसर अत्यंत चांगल्या प्रकारे सुशोभित झाला असून शिस्त आणि नियोजन उत्तम दिसून येत आहे. यामुळे रुग्णांना “सिव्हिल” आपलेसे वाटत असल्याने आनंद होत आहे. जिल्हयातील विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नागरिकांनी यावे असे आवाहनवजा प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

“ड्राय रन” कार्यक्रमावेळी पालकमंत्री पाटील हे भेटीसाठी आले असता त्यांनी महाविद्यालय व रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी अधिष्ठाता दालन, निर्जंतुकीकरण मशीन तसेच रुग्णालय आवारातील जनसंपर्क कक्ष, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्यालय, केसपेपर विभाग प्रत्यक्ष पाहिला. त्याबाबत कौतुक केले. परिसरात झालेली रंगरंगोटी आणि भित्तिचित्रांमधील रंगसंगती पाहून पाहून पालकमंत्री हरखून गेले. चित्रांमधील बोलकेपणा आणि मेहनत पाहिल्यानंतर त्यांनी अधिष्ठाता डॉ. रामानंद आणि प्रशासनाचे कौतुक केले. याठिकाणी विविध व्याधींवर उपचार घेण्यासाठी रुग्णांनी आनंदाने यावे, असे आवाहन करीत “रुग्णालयात उत्तम बदल करीत सुधारणा झाल्या” अशी प्रतिक्रिया पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

यानंतर अधिष्ठाता दालनात येऊन पालकमंत्र्यांनी चर्चा केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, प्रशासकीय अधिकारी डॉ. उत्तम तासखेडकर, नोडल अधिकारी डॉ. विलास मालकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ उपस्थित होते. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी, रुग्णालय व महाविद्यालयातील नियोजनाची माहिती देत परिसरातील विविध प्रश्न मांडले. त्यात रुग्णालयात येणाऱ्यांसाठी सुलभ प्रसाधनगृह व शौचालय बांधणे, जनरेटर सुविधा व वाहनतळ सपाटीकरणासह अद्ययावत करून देण्याबाबत पालकमंत्र्यांनी होकार दर्शविला असून प्रस्ताव द्या, लगेच निधी उपलब्ध करून देतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुढील १५ दिवसात सुलभ प्रसाधनगृह व शौचालय बांधण्याचे, जनरेटर उपलब्धता व वाहनतळ अद्ययावतीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे.

पालकमंत्री पाटील यांना अधिष्ठाता रामानंद यांनी सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे रुग्णालयातील सर्व विभाग व परिसर दाखविला. विविध रुग्णकक्षात रुग्णसेवा करीत असलेले डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी, चोहोबाजूला उपस्थित सुरक्षारक्षक, शिस्तबद्ध वाहनतळ, ओपीडी कक्ष, कोरोना कक्ष, स्त्रीरोग व प्रसूती कक्ष, दुसऱ्या मजल्यावरील स्त्री व पुरुषांचे उपचार कक्ष पाहून पालकमंत्री सुखावले. त्यांनी आरोग्ययंत्रणेचे कौतुक केले. आपण दिलेल्या प्रोत्साहनामुळे आमचे मनोबल निश्चितच वाढणार आहे. पुढील काळात देखील निश्चितच आणखी चांगली रुग्णसेवा देण्यावर आमचा भर राहील असे यावेळी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सांगितले.


 

 

Previous Post

भूतानच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Next Post

महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणारा आरोपीला अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणारा आरोपीला अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon