पुणे /जळगाव – जळगाव येथील रहिवासी आणि राजा ट्रॅक्टरचे राजाभाई मयुर यांचे चिरंजीव सिद्धार्थ मयूर, पुणे प्रवर्तित एचटूई पॉवर सिस्टिम्स प्रायव्हेट लि. ची जर्मनीत असलेली उपकंपनी एम पॉवर कंपनीने स्वित्झर्लंड येथील फ्युएल सेल स्पेशालिस्ट हेक्सिस एजीचे १०० टक्के अधिग्रहण केले. याबाबतच्या खरेदी करारावर नुकत्याच स्वाक्षरी करण्यात आल्या. अधिग्रहणाचा जळगाव ते स्वित्झर्लंड हा प्रवास मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप कार्यक्रमाची फलनिष्पत्ती आहे. असे एम पॉवर कंपनीने प्रवर्तक सिद्धार्थ मयूर म्हणाले. एचटूई पॉवर सिस्टम्स् प्रायव्हेट लिमिटेड या भारताच्या पहिल्या स्वयंनिर्मित फ्युअल सेल कंपनीने तिच्या क्लायमेट चेंज प्रतिबद्धतेसह हायड्रोजन ईकॉनॉमीवर लक्ष केंद्रित केलेय.

या अधिग्रहणानंतर एचटूई पॉवर सिस्टम्स् प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक व संचालन निदेशक सिद्धार्थ मयूर म्हणाले, “हे अधिग्रहण हा क्लायमेट चेंज (ऋतुचक्र बदल) बाबतच्या प्रयत्नांचा महत्वाचा टप्पा आहे. हेक्सिस द्वारे आम्हाला वैश्विक पातळीवर उत्पादन श्रेणी व जागतिक उत्पादन क्षमतेचा वारसा मिळाला आहे. ज्यामुळे ही उत्पादने सामान्यांसाठी परवडणारी असतील. हायड्रोजन व फ्युअल सेल तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक घरात, प्रत्येक व्यापारी संस्थेत व प्रत्येक शहरात पोचण्याचा आमचा मानस आहे. व्हिएसमान ही कंपनी आमची ज्येष्ठ सहयोगी आणि भक्कम ग्राहक आहे. रिअल इस्टेट, वाणिज्य आणि ग्रीन हायड्रोजन मार्केट व्यतिरीक्त आम्ही हेक्सिस उत्पादनांचा विस्तार कृषी, ऑईल अँड गॅस व टेलिकॉम मधील उद्योगापर्यंत वाढवू इच्छितो. झालेले अधिग्रहण हे जागतिक बाजारात क्लीन एनर्जी (स्वच्छ उर्जा) तंत्रज्ञानाचा परिचय घडवून स्वावलंबी भारतासाठी स्वदेशी ऊर्जा निर्मितीचे आमचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने उचललेले महत्वाचे पाऊल आहे.” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्याचप्रमाणे एचटूई पॉवर सिस्टीम्स प्राव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष अदार पुनावाला म्हणाले, “या अधिग्रहणाद्वारे आमच्या वाढत्या परिवारात एका नवीन सदस्याची भर घालून क्लायमेट चेंज बाबत संशोधन कार्य अधिकच मजबूत होणार आहे. आम्ही स्थानिक स्तरावर जागतिक झिरो एमिशन पॉवर जनरेटर्सची (शून्य उत्सर्जन ऊर्जा जनित्रांची) निर्मिती करू शकतो. कोळसाजन्य ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करू शकतो.” ते पुढे म्हणाले, “जग कोव्हिड-१९च्या कठीण काळातही क्लायमेट चेंज (ऋतुचक्र बदलावरील) उपाय शोधण्याचे प्रयत्न आम्ही सुरूच ठेवले आहेत.







