जळगाव;- येथील गोदावरी अभियांत्रिकीचे प्रा.विजय व्ही चौधरी,प्रा. हेमराज धांडे, प्रा महेश पाटील यांनी अथक प्रयत्नांनी अवघ्या दोन दिवसात कोविड रूग्णांना उपयुक्त यु.व्ही सॅनिटायजर मशिनची निर्मीती केली आहे.
नुकतेच जिल्हाधिकारी सो यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातील ४०० बेड कोविड व ३५० बेड नॉन कोविड रूग्णांसाठी अधिग्रहीत केले. कोविड रूग्णांना जास्तीत जास्त चांगली सुविधा देण्यासाठी गोदावरी समृहच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपले प्रयत्न सूरू करून दोनच दिवसात टाकाउ वस्तूपासून टिकाउ यु व्ही सॅनिटायजरची निर्मीती केली आहे. यामूळे कोविड रूग्णांनी वापरलेल्या वस्तू सॅनिटाईज करणे गरजेचे असते. कोरोना फायटरसाठी उपयुक्त असे हे उपकरण आहे.डॉक्टर, परिचारीका, सफाई कामगार आपल्या कामावरून घरी जातांना अंगावरील पी पी ई कीट, घडयाळ, मोबाईल,व अन्य साहीत्य या मशीनमध्ये निर्जंतूक करू शकतात.घरगुती वापरासाठी देखिल हे मशीन उपयुक्त आहे.आपण बाहेरून आल्यावर मोबाईल, भाजीपाला,व इतर वस्तू या पोर्टेबल यु व्ही सॅनिटायझर मध्ये टाकून दिल्यास निर्जंतूकीकरण होईल. सॅनिटायझरवर डोळयाला व त्वचेला इजा होणार नाही यासाठी सुचनाही करण्यात आलेल्या आहे.२०० ते २८० नॅनो मिटरचे अल्ट्रा वायोलेट किरणहे बॅक्टेरिया यासारखे सुक्ष्मजिवाणू पुर्णपणे मारण्यास उपयुक्त आहे. हे सॅनिटायझर यु.व्ही लाईट व जून्या फ्रीजचा उपयोग करून तयार करण्यात आले आहे. यामध्ये गरजेनुसार क्षमता लक्षात घेउन विविध प्रकारच्या पध्दतीने लहान मोठे तिन मॉडेल तयार करण्यात आलेले आहे.साधारण ४९००/— इतक्या कमी कीमतीत हे उपकरण तयार करण्यात आले आहे. प्राध्यापकांच्या यशाबददल गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा.डॉ उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्य डॉ केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. व्ही एच पाटील, उपप्राचार्य प्रविण फालक,गोदावरी आय एम आर चे संचालक डॉ प्रशांत वारके यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.