जळगाव (प्रतिनिधी)- मोहाडी येथील विवाहितेला ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून 1 लाख रूपये आणावेत यासाठी शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकिस आली असून तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींविरूध्द एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पुनम घनश्याम सोनवणे हिचा विवाह 2017 साली मोहाडी येथील घनश्याम सोनवणे याच्यासोबत झाला होता. मात्र, लग्नात चांगला हुंडा दिला नाही, या कारणावरून तिचा सतत छळ होत होता. तसेच माहेरून ट्रॅक्टर घेण्यासाठी 1 लाख रूपये घेवून यावे यासाठी पतिसह सासु, सासरे, नणंद यांनी दोन टप्प्यात 50,50 हजार आणण्यासाठी तगादा लावला होता, या छळाला करून तिने गळफास घेवून आत्महत्या केली. भाऊ गणेश नन्नवरे याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला पती घनश्याम सोनवणे, सासरा राजेंद्र सोनवणे, सासु संगीताबाई सोनवणे, नणंद सरलाबाई सोनवणे आदींविरूध्द फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.