जळगाव;- जळगाव महापालिकेमध्ये रुग्णवाहिन्यांची संख्या कमी असल्याने, आमदार निधीतून महापालिकेसाठी दोन रुग्णवाहिका देण्यात येणार असून यातील एका रुग्णवाहिकेची लोकार्पण आ. राजूमामा भोळे यांच्याहस्ते करण्यात आले. दुसरी रुग्णवाहिका देखील जनतेच्या सेवेत उपलब्ध होईल असा विश्वास आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी महापौर जयश्रताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील , मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी , मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिरीष ठुसे, जेष्ठ नगरसेवक सुनील महाजन, नगरसेवक विशाल त्रिपाठी ,भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, मनपा वैद्यकीय अधीक्षक राम रावलाने आदींची उपस्थिती होती. दरम्यान, आमदार भोळे यांनी यावेळी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या कठीण काळात पुन्हा एक कोटी रुपयांचा कोवीड निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.







