जळगाव प्रतिनिधी ;- येथील कोल्हेनगरातील बंद असलेल्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून दागिने व रोकड असा सुमारे ३५ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , विशाल रणजितसिंग पाटील (वय-३२) हे खासगी कंपनीत नोकरीला असून कोल्हे हिल्स परिसरातील माऊली नगरात पत्नी सोनाली व मुलगी युक्ता यांच्यासह रहिवासी आहेत . . ७ जानेवारी ते घराला कुलुप लावून पत्नी व मुलीसह दोंडाईचा येथे गेले होते. सोमवारी रात्री घरी परतले असता दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला होता तर घरातील कपाटही उघडे होते. रट्यांनी १२ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ३ हजार रुपये किमतीची मुलीची सोन्याची अंगठी, १० हजार रुपये रोख व ५ हजार रुपये किमतीच्या लहान मुलांच्या सोन्याच्या कड्या असा ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे उघड झाले. पाटील यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ठसे तज्ज्ञांनी ठशांचे नमुने घेतले. तपास सतीश हळणोर करीत आहेत.







