राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन
पहुर. ता.जामनेर-पहुर येथील कोविड सेंटर वर कोरोना संशयित म्हणून अपमानास्पद वागणूक दिली याप्रकरणी जामनेर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संजय गरुड व प्रदीप लोढा यांच्या मार्गदर्शनानुसार नायब तहसीलदार सुभाष आप्पा कुंभार यांना निवेदन देण्यात आले.
खर्चाने येथील नागरिक श्री गिरीष पंडित पाटील यांच्यासोबत कोरोना संशयीत म्हणून झालेल्या अपमानस्पद वागनुकी बद्दल तसेच त्यांच्या सोबत त्यांच्या परिवारातील तसेच गावातील इतर नागरिकांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी यासाठी शासनाला तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शैलेश कृष्णा पाटील युवक अध्यक्ष जामनेर ता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्याम भाऊ सावळे उपसरपंच पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत, किशोर पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख, राजू भाई जेंटलमन अल्पसंख्यांक अध्यक्ष, ईश्वर बारी ग्रा.पं सदस्य.आदी उपस्थित होते.