चाळीसगाव;- शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता शेतातील वीज पुरवठा खंडित केल्यामुळे सांगवी येथील संतप्त शेतक-यांनी एका दिवसात खंडित वीज पुरवठा सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे केला आहे.
नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सरपंच डॉ महेंद्रसिंग राठोड , संतोष राठोड, सचिन ठाकरे, दयाराम चव्हाण, भावलाल जाधव, विजय देशमुख, बंडु चव्हाण, भास्कर चव्हाण, ज्ञानेश्वर पवार, संतोष राठोड, प्रकाश राठोड, उदल चव्हाण, गोवर्धन चव्हाण, वाडीलाल राठोड, धारासिंग चव्हाण, रामा राठोड, मंगेश चव्हाण, तुकाराम चव्हाण, काशीनाथ जाधव आदी उपस्थित होते .