नाशिक ( प्रतिनिधी ) – मनमाडमध्ये काल मध्यरात्री एका तरुणाची हत्या करुन पाच तरुण फरार झाले आहेत. मैत्रिणीला फेक आयडी बनवून त्रास दिल्याच्या रागातून हे कृत्य त्यांनी केल्याची प्राथमिक माहिती आहे. रेल्वे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनमाड रेल्वे स्थानकावर ही खळबळजनक घटना घडली. शिवम पवार असे हत्त्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मनमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत शिवम पवार मैत्रिणीची फेक आयडी बनवून तिला त्रास देत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या इतर 4 ते 5 तरुणांनी चाकूने वार करून हत्या केली. मनमाड रेल्वे स्थानकावर या तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले.