जळगाव (प्रतिनिधी ) – पारोळा तालुक्यातील तरवाडे खुर्द येथील ३५ वर्षीय शेतकऱ्याचा पिकावर फवारणी करताना नाका-तोंडात औषध गेल्याने मृत्यू झाला पांडुरंग शिवाजी चौधरी असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
पांडुरंग चौधरी सकाळी कापसाच्या पिकाला फवारणी करण्यासाठी जातो असे कुटुंबीयांना सांगून गेले. त्यानंतर सुनील चाैधरी दुपारी पांडुरंग चौधरी यांचा जेवणाचा डबा देण्यासाठी शेतात गेले. या वेळी बोरीच्या झाडाजवळ पांडुरंग चाैधरी फवारणी पंपासह पडलेले दिसले.
ते बेशुद्ध हाेते त्यानंतर सुनील चाैधरी यांनी पाेलिस पाटील राजपाल चौधरी, संदीप पाटील व सुमित पाटील यांना माहिती दिली. त्यांनी चौधरी यांना कुटीर रुग्णालय दाखल केले. तपासणी करुन डॉक्टरांनी चाैधरी यांना मृत घोषित केले. तपास पोलिस सुधीर चौधरी करत आहेत.