अमळनेर तालुक्यातील एकतास येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील एकतास येथील ४४ वर्षीय शेतकऱ्याला शेतात फवारणी करत असतांना विषबाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असतांना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नितीन हिम्मत पाटील (वय ४४ रा. एकतास ता.अमळनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. नितीन पाटील हे कुटुंबियांसह एकतास गावात वास्तव्याला होते. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गुरूवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी त्यांच्या शेतात फवारणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना विषबाधा झाली. त्यामुळे त्यांना अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता मृत्यू झाला. याबाबत रविवारी २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहे.