
एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल


जळगाव (प्रतिनिधी ) बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड तयार करून परस्पर प्लॉट विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि सुरेशचंद्र मांगीलाल बाफना वय 61 वर्ष यांनी 07/06/2007 रोजी धरमचद दिवराज सेठीया, रा. एम. 17. एम. आय. डी. सी.जळगाव यांच्याकडून मौजे मेहरुणमधीलशेत सर्वे नं. 163/1 प्लॉट क्रमांक 17 या क्षेत्र 280 50 चौरस मिटर असा असलेला 1,41,000/ रुपयात खरेदी केला होता.
प्लॉट नं 17 बाढ़ प्लॉटची विक्री करणे असल्याने सुरेशचंद्र मांगीलाल बाफना हे 24रोजी तलाठी ऑफीस जळगाव येथे गेले असता सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव कमी झाल्याचे लक्षात आले. त्या उता-यावर 1) इमाम मुख्तार तांबाळी, 2 रजीयाबी मुस्ताक खटीक, (3) शेख अयुब शेख युसुफ तांबोडी, 4) शेख जुबेर शेख सलाम खाटीक यांचे नाव लागलेले होते. याबाबत तलाठी यांना विचारणा केली असता इम्रान मुख्तार 22 वर्षदा हातमजुरी, रा. प्लॉट नं. 45, इंद्रप्रस्थनगर, एम. आग.डी.सी., जळगाव आधार कार्ड 381266183142 या इसमाच्या नावावर झालेला दिसला. सदरचा प्लांट हा माझे नाव सुरेशचंद्र मांगीलाल बाफना वय 51 वर्ष पदाव्यापार, रा सुयोग कोलनी, जळगाव आधार कार्ड नंबर 888870201052 यांचे कडुन 5.84,000/- रु किमतीला खरेदी केल्याचे दिसून आले. तसेच खरेदी खतावर सुरेशचंद्र बाफना यांच्या नावासमोर बाफना यांच्या नावाची सही व दुस-याच इसमाचा फोटो असल्याचे दिसले, अरुणा दिलीप चौधरी, वय 52 वर्ष, रा. एल.आय.सी. कॉलनी, जळगाव फारुख शेख रहेमदुबा खाटीक, वय 47 वर्ष, रा. मास्टर कॉलनी, जळगाव यांनी हार राहुन संगणमताने माझ्या नावाचे बनावट कागदपत्रे तयार करून ते खरे असल्याचे भासवुन त्याचा वापर करून खरेदीखत तयार करुन सदरचा प्लॉट हा परस्पर विक्रि करून माझी व शासनाची फसवणूक केली आहे. सदर बाबत माझी फसवणुक कशी झाली व सविस्तर माहीती घेवुन व कागदपत्र प्राप्त करून आज रोजी मी फिर्याद देण्यास आलो आहे.
तरी 02/03/2021 रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने माझ्या नावाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करून सदर कागदपत्राच्या आधारे माझ्या नावाचा दुसरा व्यक्ती दुय्यम निबंधक कार्यालयात उभा करून माझ्या मालकिचा असलेला जळगाव शहर महानगर पालीका हथीतीत मौजे मेहरुण मधील शेत सर्वे नं. 163/1 मधील बाळ प्लॉट नं. 17 याची किंमत 35,00,000/- लाख रुपये किंमतीचा असलेला प्लॉट हाइम्रान मुख्तार तांबोळी रा प्लॉट नं. 45 इंद्रप्रस्थ नगर एमआयडीसी जळगांव याने खरेदी करून तसे मा सहा, दुय्यम निबंधक सो, जळगाव 01, यांच्या कडे तसा दस्त क्रमांक 756/2021 नुसार खरेदीखत नोदबुन प्लॉट खरेदी केला आहे व सदर माझ्या प्लॉट वर त्याचे नाव लावले आहे. तसेच खरेदीखत करतेवेळी अरुणा दिलीप चौधरी, वय 52 वर्ष, रा. एल.आय.सी. कॉलनी, जळगाव व फारुख शेख रहेमदुला खाटीक, वय 47 वर्ष, रा. मास्टर कॉलनी, जळगाव यांनी हजर राहुन खरेदी लिहून घेणार व लिहून देणार याना ओळखतात अशी खोटी माहीती सांगुन त्यांनी सर्वांनी संगणमताने माझ्या नावाचे मुल्यवान कागदपत्रे आधारकार्ड व पैनकार्ड असे बनावट तयार करून ते खरे असल्याचे भासवून त्या कागदपत्रानुसार माझ्या प्लॉटची खरेदी करून बाफना यांची फसवणुक केली. याबाबत बाफना यांच्या ताकारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








