अमळनेर (प्रतिनिधी )- कॅब बुक करायची असेल तर ॲप डाऊनलोड करणाऱ्या एकाची ४९ हजारात फसवणूक झाल्याचा प्रकार येथे उघडकीस आला असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनराज शंकर पाटील (वय-५०) रा. पवन चौक, यांना ८ रोजी नाशिक येथे जायचे असल्याने त्यांनी गुगलवरून एका वेबसाईटवर चौकशी केली असता त्यांना एका अनोळखी नंबरवरून माहिती देण्यात येऊन ॲप डाऊनलोड करून सर्व माहिती भरण्याचे सांगितले. मात्र धनराज पाटील यांनी माहिती भरली असता काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ४९ हजार रुपये काढल्याचा प्रकार घडला. अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक जयपाल अहिरे करीत आहे.